नांदगाव: मारुती जगधने
माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो नाशिक व योगदर्शन योग केंद्र यांच्या वतीने मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निकल महाविद्यालय एकलहरे येथे योगा काउंट डाऊन कार्यक्रम दिनांक 6/6 l/ 2025 रोजी संपन्न झाला. यावेळी योगदर्शन योग केंद्राचे संचालक योग गुरु बाळासाहेब मोकळ (वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर) यांनी योग साधनेचे महत्त्व व योग काळाची गरज याविषयी व्याख्यान दिले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधन करताना योग गुरू बाळासाहेब मोकळ यांनी विद्यार्थ्यांना योग साधना फक्त 21 जूनला न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून रोज आसन, प्राणायाम याचा अभ्यास केला पाहिजे असे सांगितले. कारण आपले शरीर जर चांगले असेल तर जीवनात आपण सर्व काही साध्य करू शकतो. आज नैसर्गिक मृत्यूपेक्षा अनैसर्गिक मृत्यू जास्त होत आहे. हृदयविकार मधुमेह रक्तदाबाची विकार समाजामध्ये वाढताना दिसत आहे याला कारण म्हणजे बदलती जीवनशैली व स्पर्धेचे युग यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. परंतु प्रत्येकाने कमीत कमी एक तास योग साधना जर केली तर नक्कीच आपण व्याधी व विकारा पासून दूर राहू शकतो. व आपणास चांगले शारीरीक,मानसिक स्वास्थ्य मिळू शकते. यातून खऱ्या अर्थाने निरोगी पिढी व समाज चांगला घडू शकतो. त्याचबरोबर प्रा मोकळ यांनी योगसाधना करत असताना ती सतत केली पाहिजे असे सांगितले त्याचबरोबर आपण आहार ,विहार, आचार व विचार याचे देखील पालन केले तर आपले शरीर नक्कीच निरोगी राहू शकते व नंतर विद्यार्थ्यांकडून योगा प्रोटोकॉल करून घेतला. व्याख्यान व प्रोटोकॉल यावर आधारित प्रश्नोत्तरे स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यातून प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या प्रथम चार विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षत्रिय ब्यूरो नाशिकचे प्रसार अधिकारी सदाशिव मलखेडकर यांनी केले. या कार्यक्रमात योगदर्शन योग केंद्राची विद्यार्थिनी अश्विनी पुरी यांनी सुंदर असे काव्य वाचन केले व केंद्राचे विद्यार्थी लोकेश सोनी, अभिजीत पुरी, प्राजक्ता कुलकर्णी, प्रियंका कुलकर्णी, अश्विनी पुरी यांनी सुंदर असे योग नृत्य सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य एस रेलकर उपप्राचार्य आदमाने , यश धात्रक , डेरले मॅडम अमित कुमार , जी एस नरवडे, मॅडम, गीते , वंदना थिगळे,ज्येष्ठ योगशिक्षक सुधीर कुलकर्णी , गायत्री मोकळ, शोभा गवारे उपस्थित होते.












