loader image

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

Jun 16, 2025


मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात झालेल्या धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांना यश आले असून या प्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १ किलो ५५.८५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
दिनांक ११ जून २०२५ रोजी मुर्तजा रस्सीवाला आणि त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला आणि १,२०० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ८ लाख रुपये रोख रक्कम चोरली. या घटनेची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली (गु. रजि. नं. ३५९/२०२५, भा.द.वि. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३(५)). नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मनमाड) बाजीराव महाजन यांनी तातडीने दखल घेत तपासासाठी मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर आणि मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती, श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ञ आणि फॉरेन्सिक टिमच्या सहाय्याने तपासाची दिशा निश्चित केली. गुन्हेगारांनी वापरलेली पद्धत आणि परिसरातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पोलिसांनी मनमाड आणि चांदवड परिसरातील सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार, खालील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
१. संजय किशोर गायकवाड (वय ३५, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड)
२. राकेश अशोक संसारे (वय ३०, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड)
३. राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या (वय ३०, रा. मदिना चौक, नाशिक; मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश)
चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूल जबानी दिली. त्यांच्याकडून १,०५५.८५० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत १ कोटी ५ लाख ४० हजार रुपये) आणि गुन्ह्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली. उर्वरित मालमत्तेच्या शोधासाठी तपास सुरू आहे.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
– राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या: याच्यावर नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ घरफोड्या, १ दरोडा तयारी, ४ चोऱ्या आणि १ जबरी चोरी असे एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. हा अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमधून जामिनावर सुटला होता.
– संजय किशोर गायकवाड: यांच्यावर मनमाड आणि इतर ठिकाणी ५ घरफोड्या, २ चोऱ्या, १ दुखापत आणि इतर कायद्यांतर्गत ८ गुन्हे दाखल आहेत.

– राकेश अशोक संसारे: याच्यावर १ गंभीर दुखापत, १ चोरी, १ दंगा आणि रेल्वे कायद्यांतर्गत ४ गुन्हे नोंद आहेत.
पोलिसांनी या तिन्ही सराईत गुन्हेगारांना अटक करून मोठी कामगिरी केली असून, याप्रकरणी आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास मनमाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.
पोलीस पथकाचे कौतुक
या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि किशोर जोशी, पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, प्रवीण काकड, विशाल आव्हाड, रावसाहेब कांबळे, प्रितम लोखंडे, श्रीकांत गारूंगे, सागर काकड, शैलेश गांगुर्डे, गोरक्षनाथ संवत्सरकर, योगिता काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, केतन कापसे, दत्ता माळी, हरिष माळी, अमोल गांगुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या यशस्वी कारवाईबद्दल पथकाचे अभिनंदन केले आहे.
नागरिकांना आवाहन
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना घरात मौल्यवान वस्तू ठेवताना खबरदारी घेण्याचे आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.