loader image

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शाळा प्रवेशदिन साजरा

Jun 17, 2025


. येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेचा पहिला दिवस म्हणजे शाळा प्रवेशदिन विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवेशद्वार आणि संपूर्ण शालेय परिसरात रांगोळी फुले यांची सजावट करण्यात आली होती .तर विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले .के जी विभागातील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी या विभागाच्या शिक्षकांनी वर्गात रांगोळी प्रवेशद्वारावर तोरण वेली व फुगे यांची सजावट केली होती. प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते केजी विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे व चॉकलेट चे वाटप करण्यात आले. प्राचार्य मुकेश मिसर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून चालू शैक्षणिक वर्षात शाळेची संपूर्ण टीम दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी सज्ज आहे विद्यार्थ्यांनी देखील सर्व मार्गदर्शक सूचनांचा पालन करून आपली गुणवत्ता वाढविण्यासाठी आपले योगदान द्यावे व त्यात वर्षभर सातत्य ठेवावे असे आवाहन व मार्गदर्शन पर सूचना केल्या. प्राचार्य, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रवेशद्वारावर बांधलेली फीत सोडून शाळा प्रवेशाचा श्री गणेशा करून विद्यार्थ्यांना वर्गात पाठविण्यात आले.
तसेच शाळा सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली होती .
सौ अर्चना संसारे श्रीमती गायत्री मिश्रा भारती पवार सौ वैशाली रसाळ सौ स्वाती बिडवे आणि त्यांच्या सहशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीचे प्रवेश उत्सवा चे आयोजन करण्यासाठी सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.