loader image

छत्रे विद्यालयाचा ९७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Jun 18, 2025


**
मनमाड चे भूषण असलेल्या छत्रे विद्यालयाचा ९७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.प्रास्ताविक सौ. देसले यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर यांनी भूषविले.या प्रसंगी मुख्याध्यापक प्रविण व्यवहारे यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ,संगिता पोतदार,संदीप देशपांडे,दिघीळे गुरुजी,रमाकांत मंत्री,डॉ.इंगळे यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उज्वल यशाच्या परंपरेचा उहापोह केला व शाळेच्या स्थापने पासून वेळोवेळी आपले तन,मन,धन अर्पण करून मान्यवरांनी केलेले मोलाचे योगदान अधोरेखित करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.काही विद्यार्थी व पालकांनीही आपल्या मनोगतातून शालेय व्यवस्थापन व शिक्षक वर्गाचे कौतुक केले.तसेच या प्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज राजेश परदेशी च्या पालकांचा तसेच राष्ट्रीय पदक विजेती आनंदी विनोद सांगळे व इ.10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला इ 10 वी चे वर्ग शिक्षक गुणेश गुजर,एस.यु.देशपांडे,ए. बी.देसले यांचा ही सत्कार करण्यात आला.श्री दिंडोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या उत्कृष्ठ मॅनेजमेंटचे व सतत सर्वोच्च निकालाची परंपरा राखण्यासाठी मेहनत करणाऱ्या शिक्षक वर्गाचे कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पुरषोत्तम दिंडोरकर,सचिव दिनेश धारवाडकर,संचालक बी.एस.कुलकर्णी,नाना कुलकर्णी,संचालक व पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक प्रविण व्यवहारे,उप मुख्याध्यापक संदीप देशपांडे,वरिष्ठ पर्यवेक्षिका संगिता पोतदार,प्राथमिक विभागाचे प्रमुख दिघोळे गुरुजी,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री मोरे,बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.गवते,माजी मुख्याध्यापक गाडगीळ पी बी ,पवार डी टी ,थोरात ऐट एन तसेच देणगीदार कौशल शर्मा, गुरुजीतसिंग कांत,शशिकांत व्यवहारे,रमाकांत मंत्री,विजय बेलदार,सुमंत अंबर्डेकर,नयना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आंबर्डेकर,यांनी तर आभार प्रदर्शन ए.बी.भोये यांनी केले.शितल चव्हाण,सौ देसले, समाधान ठाकूर,यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

.