loader image

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

Jun 18, 2025


 

मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक या महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान करण्यात आला असून यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतिम पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात १९६९ मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयात आज १३ विषयात पदवी, ०७ विषयात पदवीत्तर तर ०२ विषयात संशोधन केंद्र सुरू त्याचप्रमाणे बी.व्होक. अंतर्गत ०३ विषयात पदवी,कम्युनिटी कॉलेज अंतर्गत ०४ विषयात डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु असून महाविद्यालयात आज २००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असुन ३१ शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी स्वायत्तता प्रदान केली आहे. त्यामुळे, महाविद्यालयाला आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रमाणे स्वतःचा अभ्यासक्रम तयार करणे शक्य होणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून बी. एस्सी. कॉम्पुटर सायन्स हा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
याशिवाय, महाविद्यालयाला विविध प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमही सुरू करता येणार आहेत. नियामक मंडळ, विद्या परिषद, अभ्यास मंडळ, वित्त समिती आदींचे महाविद्यालयावर नियंत्रण असल्याने गुणवत्ता व पारदर्शी कारभारात वाढ होणार आहे. जागतिक दर्जाच्या प्राध्यापकांना महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर नेमणे शक्य होणार आहे. परिणामी, महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा देखील जागतिक दर्जाचा होणार आहे.
याच वर्षी नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार झालेल्या नॅक पुनर्मूल्यांकनामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करून महाविद्यालयाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालया ने CGPA 3.22 सह नॅकची A श्रेणी प्राप्त केली आहे. त्यामुळे, महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असून त्याचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
विशेष म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग ,संबंधित शिखर संस्था ,परिसंस्था , नियामक मंडळ आणि भारत सरकार, महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, परिनियम, आदेश, मार्गदर्शक तत्वे इत्यादीच्या अधीन राहून, येत्या शैक्षणिक वर्षापासून पुढील १० वर्षे कालावधीसाठी ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान करण्यात आला आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम तसेच या विभागातील परिपत्रकांमधील मार्गदर्शक तत्वे महाविद्यालयास बंधनकारक असणार आहेत.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ.प्रशांत हिरे , कोषाध्यक्षा डॉ.स्मिता हिरे , उपाध्यक्ष डॉ.हरीश आडके , सहसचिव डॉ.व्हि. एस. मोरे, समन्वयक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.अपूर्व हिरे, समन्वयिका डॉ. संपदा हिरे, प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांनी स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.