दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर( क्रमांक 7 ) घेण्यात आले . शिबिरात पन्नास रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येऊन डोळ्याचे नंबर काढून देऊन अल्प दरात चष्मा देण्यात आले. तसेच तीन मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांची रोटरी आय हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. शिबिरासाठी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद सुर्वे सचिव डॉ सैफ काझी सदस्य उमेश पाठक हेमंत देशमुख आय्युब शेख संदीप वाघ डॉ नितीन जाधव यांनी मेहनत घेतली. समर्थ मेडिकल चे संचालक रामकृष्ण जाधव यांनी सहकार्य केले . अनकाई गावाचे सरपंच सागर सोनवणे माणुसकी फाउंडेशन चे अलकेश कासलीवाल डॉ सचिन वैद्य डॉ सुधीर जाधव किरण बढे बाळकृष्ण चव्हाण संतोष टिटवे तनय वैद्य चंद्रभान व्यापारे यशराज लुले अशोक अहिरे संदीप धिवर निलेश गोसावी सुरज परदेसी आदींनी शिबिरास भेट दिली. अनकाई सारख्या एका लहान गावात येऊन रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक ने हा चांगला प्रकल्प राबवला या बद्दल ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले .असेच मनमाड च्या आजू बाजू च्या ग्रामीण भागात शिबीर घेवून ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यसेवेचा मनोदय क्लबचे अध्यक्ष डॉ रविंद्र सुर्वे यांनी व्यक्त केला