loader image

जागतिक योगदिनानिमित्त नाशिक रोड रेल्वे स्थानकावर तीन दिवसीय योग महोत्सव संपन्न

Jun 21, 2025


*
नांदगाव ..मारुती जगधने
* नाशिक रोड रेल्वे प्रबंधक केंद्रीय संचार, भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो नाशिक आणि योगदर्शन योग केंद्राचा उपक्रम च्या माध्यमातून या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा योग प्रात्यक्षिके रेल्वे स्थानकावरती रेल्वे स्टेशन वरती घेण्यात येत आहे आणि विशेष करून नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशन वरती या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

दिनांक एकोणावीस ते २१जून रोजी या योग कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रम सलग तीन दिवस सुरू होते या कार्यक्रमांमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवलेला.
नाशिक येथेआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर तीन दिवसीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरो, नाशिकचे क्षेत्रीय कार्यालय, योगदर्शन योग केंद्र नाशिक रोड आणि नाशिक रोड रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ जून या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला.

या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दिनांक १९ जून रोजी रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय जुन्या तिकीट कार्यालयाजवळ पार पडला. उद्घाटन प्रसंगी नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे प्रबंधक मनोज कुमार श्रीवास्तव, माजी नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सीमा ताजने, केंद्रीय संचार कार्यालयाचे प्रसार अधिकारी सदाशिव मलखेडकर, योगदर्शन योग केंद्राचे योगगुरु बाळासाहेब मोकळ आणि सामाजिक कार्यकर्ते विलास थोरात उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा, महिला व पुरुष गटातील योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी . प्रा . बाळासाहेब मोकळ यांनी “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ” या २०२५च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संकल्पनेशी सुसंगत अशी 51योगासने व 14 सूर्यनमस्कार प्राकृतिक पृथ्वी प्रतिकृती वर सादर करत चौथ्यांदा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मर्यादित जागेत स्थिरता व समतोल राखत प्राकृतिक पृथ्वीवर केलेले हे सादरीकरण उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले. यावेळेस नागरिकांना मार्गदर्शन करताना प्रा मोकळ यांनी योग साधनेचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश करून आपले स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कसे चांगले ठेवू शकतो यासाठी योगसाधना करण्याचे आव्हान केले आपले आरोग्य चांगले असेल तर आपण जीवनामध्ये सर्व काही साध्य करू शकतो त्यामुळे आरोग्यम् धनसंपदा या अनुषंगाने आपण आपल्या स्वतःसाठी एक तास दिला तर नक्कीच आपले परिवाराचे समाज व देशाच्या आरोग्य चांगले राहू शकते हा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्युरो नाशिकचे प्रसार अधिकारी सदाशिव मलखेडकर यांनी यांनी केले यावेळेस त्यांनी त्यांच्या कार्यालयात मार्फत चालणाऱ्या अनेक समाज प्रबोधन कार्यक्रमांची माहिती दिली त्याच बरोबर योगसाधना सर्व नागरिकांनी आपल्या जीवनात रोज योग सराव करावा असे आव्हान केले.

कार्यक्रमात योगशिक्षिका अश्विनी पुरी यांनी सादर केलेली योग विषयक कविता लक्षवेधी ठरली. तसेच ‘ट्रँगल योगा’च्या वतीने राज बंबानी, अश्विनी पुरी, लोकेश सोनी, अभिजीत पुरी, प्रियांका कुलकर्णी आणि प्राजक्ता कुलकर्णी यांनी योग नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

रेल्वे प्रबंधक मनोज कुमार श्रीवास्तव यांनी आपल्या मनोगतातून योगाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना योग जीवनशैलीत सामील करण्याचे आवाहन केले. जोरदार पाऊस असताना देखील नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला व आयोजकांनी कार्यक्रम सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पाडण्याचा यशस्वी असा प्रयत्न केला .

महोत्सवाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी म्हणजे २० व २१ जून रोजी योगविषयक खुली वक्तृत्व स्पर्धा, म्युझिक थेरेपी आणि योग अभ्यास, योग प्रोटोकॉलचे सादरीकरण, प्रश्नमंजुषा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला आहे.

या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला, आयोजक प्रा बाळासाहेब मोकळ आणि प्रसार अधिकारी सदाशिव मालखेडकर यांनी केले आहे.यांच्यासह कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वानुमंत प्रयत्न करण्यात आले


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.