मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये “जागतिक योग दिन” साजरा करण्यात आला. शालेय प्रांगणावर शाळेतील विद्यार्थी, संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी, मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे, पर्यवेक्षकअन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या उपशिक्षिका शेख तहेजीब आरिफ,उपशिक्षक मोहम्मद साजीद यांनी योगाचे महत्व व बदलत्या जीवन शैली मध्ये योगाची आवश्यकता व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.उपशिक्षक प्रदीप पाटील यांनी सर्व विदयार्थी व शिक्षकांचे विविध योगासनाचे प्रात्यक्षिक घेतले.शाळेचे मुख्याध्यापक भुषण शेवाळे व संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.