loader image

मनमाड महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

Jun 21, 2025


येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दि . २१ जून हा जागतिक योग दिन राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. योगशास्त्राची निर्मिती प्राचीन काळापासून भारतात झाली. भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि महात्म्य योगातून समजले. योग केल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. तसेच आनंददायी जीवनासाठी नियमित योगासने करणे लाभदायक आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच प्राचार्य प्रा.डॉ अरुण पाटील यांनी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. योगाचे महत्त्व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये युनोत विषद केले. त्यानंतर जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी योगाचा स्वीकार केला. दि. २१ जुन २०१५ पासून जागतिक योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला . या अनुषंगाने Yoga for one Earth, One Health या थीम अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. बी एस देसले, कनिष्ठ विभागा चे उपप्राचार्य प्रा.एस एस अहिरे, व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य प्रा.पी.के.बच्छाव, पर्यवेक्षक प्रा डी व्ही सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षण शिबीरास महाविद्यालयाचा योगेश पवार यांनी योगासनांची प्रात्यक्षिके व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी बी परदेशी व आभार प्रा. सोमनाथ पावडे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा. सुहास वराडे, लेफ्टनंट प्रा. प्रकाश बर्डे, क्रीडा संचालक प्रा. एस.डी. कोंडुरकर, प्रा. विजया सोनवणे यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका , राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.