loader image

के आ टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये योगा दिन योगासने

Jun 22, 2025


कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल जुनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व समजून सांगितले. जीवनात शारीरिक मानसिक आणि अध्यात्मानुसार योगासने केल्यास विकास घडवून आणता येतो. त्याचा प्रत्यय ज्या लोकांना येतो ते रोज नियमित योगा करतात. अशी अनेक उदाहरणे देऊन शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी योगा दिनानिमित्त प्रात्यक्षिक केली. इ. आठवी व इ. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी योगा दिनाचे आयोजन केले होते.सृष्टी सोनवणे .सई शाकाद्विपी. अंतरा कोठावदे .लावण्या पाटील. आराध्या सांगळे. या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली योगासनामध्ये भुजंगासन. वज्रासन. ताडासन. त्रिकोणासन. वृक्षासन .पर्वतासन. अर्धचक्रासन. पद्मासन. नौकासन. दंडासन. कपालभाती. सूर्यनमस्कार. यांची प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. योगासनानंतर प्राणायाम व ध्यान यांचे महत्त्व देखील समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना योगासना विषयीचे फायदे व महत्त्व समजावून सांगितले इयत्ता पाचवी ची स्वरा कोतकर .आर्यन देवनार .या विद्यार्थ्यांनी योगा दिनाबद्दल भाषण केली प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपराचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्यासह सौ संगीता देसले कदम सिद्धार्थ पगारे विशाल झाल्टे या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ संगीता देसले कदम यांनी केले या विद्यार्थ्यांना किती शिक्षक विशाल झाल्टे, श्रुती बॅनर्जी यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.