आज दिवाणी व फौजदारी न्यायालय व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रे विद्यालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्री हरीश परदेशी साहेब उपस्थित होते.सोबत मंचावर अडव्होकेट किशोर सोनवणे,सुधाकर मोरे,रमेश अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात बालकांच्या वर होणाऱ्या अत्याचार, बलात्कार व इतर अन्याय त्याच बरोबर बालमजुरी या बद्दल व त्या साठी असलेले संरक्षण विषयक कायदे या विषयी विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये जन जागृती निर्माण करण्याच्या हेतूने सखोल असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी माननीय न्यायाधीश परदेशी साहेब यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद सादत त्यांच्या मनातील कायदे विषयक जिज्ञासा जागृत केली आणि त्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी न्यायालयाचे पाटील भाऊसाहेब, निकम भाऊसाहेब,भामरे व कॉनस्टेबल मनिषा बिडगर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण व्यवहारे,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका संगिता पोतदार उपस्थित होते. सूत्र संचालन शाळेचे शिक्षक पंकज पाखले यांनी तर आभार प्रदर्शन संदीप देशपांडे यांनी केले. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...