loader image

उबाठा गटाचे जिल्हा संघटकासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

Jun 25, 2025


 

मनमाड
उबाठा चे जिल्हा संघटक संजय कटारिया मनमाड यांच्यासह शेकडो उबाठा पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते अल्ताफ बाबा खान, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, राजाभाऊ भाबड, महेंद्र शिरसाठ, कैलास गवळी, उपस्थित होते
यावेळी आण्णांनी बोलताना प्रत्येकाची शिवसेना पक्षात स्वागत केले, यापुढे प्रत्येक सुखदुःखात मी आपल्या सोबत राहील असे विश्वासितही केले.
संजय कटारिया यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पुन्हा एकदा आम्हाला शिवसेना परिवारात सामील करून घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच विरोधात असतानाही अण्णा सतत आमच्या सुखदुःखात सामील व्हायचे दखल घ्यायचे याचा आम्हाला सतत अभिमान आहे आणि तो राहील असे मत व्यक्त केले.
प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे
संजय कटारिया जिल्हा संघटक, उबाठा, आप्पा हारदे शाखाप्रमुख अंकुश उगले शाखाप्रमुख लक्ष्मण बारसे शहर संघटक राकेश चव्हाण छगन जोहरे सनी गुप्ता राष्ट्रवादी शरद पवार गट कार्याध्यक्ष मनमाड संजय वाढणे दीपक गडाख शाखाप्रमुख वाल्मीक बारसे राज शिंदे गजेंद्र सानप शरद पवार गट कार्याध्यक्ष मनमाड सलीम भाई सोनावाला ज्येष्ठ शिवसैनिक वेदांत राऊत विलास घुले पार्थ गुजराती विलास भावसार तालुका सल्लागार उभाठा सिद्धांत राऊत सुखदेव सोळशे आकाश पवार संजय पिंगळे शफी शहा कैलास सुपेकर सोनू मिर्झा सागर निकम मंगेश सूर्यवंशी संतोष आहेर प्रकाश गांगुर्डे प्रमोद भालेराव राजाभाऊ सोनवणे वसीम शहा ज्ञानेश्वर गवळी आदींचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.