मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार मा. सुहास आण्णा कांदे साहेब यांनी अथक परिश्रम घेऊन नांदगाव,मनमाड क्रीडा संकुलात क्रीडा साहित्य व सोयी सुविधांसाठी शासनाकडून भरघोस पाच कोटीची निधी मंजूर करून आणल्याबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर,उपाध्यक्ष देवेंद्र चुनियान, सचिव जाविद मुश्ताक शेख सर, कार्यकारी सदस्य कौशल शर्मा यांच्या हस्ते आमदार मा.सुहास आण्णा कांदे साहेब यांना मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे अभिनंदन पत्र व बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मनमाड क्रिकेट असोसिएशन चे आधारस्तंभ तथा मनमाड शिवसेना युवा सेना प्रमुख आसिफभाई (पैलवान)शेख, मनमाड शिवसेना प्रमुख मयुरभाऊ बोरसे, मा.नगराध्यक्ष साईनाथभाऊ गिडगे, मा. नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील उपस्थित होते.