आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील नागरिकांनी केलेल्या विनंती वर रेल्वे पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला या पुलाचे लोकार्पण आज सौ अंजुमताई कांदे यांनी केले.
चांडक प्लॉट एसटी कॉलनी गांधीनगर भोले नगर मार्केट या परिसरातील नागरिकांकरिता हा प्रमुख रस्ता असून नदीला पूर आल्यानंतर या भागातील नागरिकांचा शहराशी अगदी संबंध तुटून जातो आणि मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
मागील वर्षी नदीला आलेल्या पुरानंतर सदर परिस्थिती उद्भवली असता चांडक प्लॉट येथील रहिवाशांनी अंजुमताई कांदे यांना पूल बांधून देण्याची विनंती केली होती. सौ अंजुमताई यांनी यावेळी स्वतः चांडक प्लॉट येथे जाऊन रस्ता पाहणी केली होती व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या यानंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर सदर पुल मंजूर झाला आणि आज तो पूर्ण झाला असून लोकांच्या वापरासाठी त्याचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी पुला वरती रांगोळी काढण्यात आली होती फुग्यांनी पूल सजवण्यात आला होता,
याप्रसंगी बोलताना नाना जाधव यांनी आमच्यासाठी हा पुल म्हणजे संजीवनी ठरणार आहे यामुळे आमच्या अनेक समस्या दूर होणार आहेत म्हणून आमदार सुहास आण्णा कांदे यांचे संपूर्ण परिसराच्या नागरिकांच्या वतीने आभार मानले.
महावीर पारख यांनी आपल्या मनोगतात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत नांदगाव शहरात मोठा विकास घडवून आणल्याचे सांगितले.
अंजुमताई कांदे यांनी आपण आमच्यावर विश्वास ठेवला आहे आपल्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच हा पूल झाल्याचा आपल्याला जेवढा आनंद होतोय तेवढा आम्हाला सुद्धा होत आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी या पुलाचे कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र परदेशी यांचा अंजुमताई कांदे यांनी सत्कार केला.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील चेतन पाटील काका सोळसे, डॉ.सुनील तुसे, राजाभाऊ जगताप, भारतीय जनता पार्टीचे दतराज छाजेड, डॉ यशवंत जाधव, नांदगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी सो., सागर हिरे प्रकाश शिंदे नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव, समाधान पाटील बाळासाहेब शेवरे साईनाथ पवार मनोज चोपडे चेतन शिंदे शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहरप्रमुख संगीताताई बागुल नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे आदींसह परिसरातील रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.