loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे जोड पुलाचे भक्कम बांधकाम सुरू; स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण

Jul 1, 2025


नांदगाव – मारूती जगधने शहरालगत असलेल्या कोल्ह्या नाल्याव
रील नांदगांव मनमाड मालेगाव रोड वरील जुना जोड पूल अपुऱ्या क्षमतेचा असल्याने गिरणा नगर हाद्दीतील पुलाच्या मागणीस जोर वाढला होता. आता अखेर नवीन भक्कम जोड पुलाचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले असून, हे काम स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
विशेष म्हणजे हाजोड पुल १५ पिलर च्या भककम बांधणी करून सिमेंट काँक्रिटचा पाया, मजबुतीकरणासाठी लोखंडी जाळ्यांची रचना, व पिलर उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल अधिक भूकंपरोधक आणि दीर्घकालीन टिकाऊ राहील, याची दक्षता घेतली जात आहे.

या नव्या पुलामुळे वाहतुकीचा अडथळा दूर होणार असून, शालेय विद्यार्थी, शेतकरी, आणि दैनंदिन प्रवासी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हनुमान नगर च्या वळणावर अनिक समस्या ” निर्माण होत असे पण जुना पुलाची भिंत मात्र अत्यंत साध्या पद्धतीत दिसून आली कारण जोडपुलाचे काम करतांना जुन्या पुलाची शितीचा पाया नसल्यान चे दिसून आले आमदार निवास सावरकर वसाहत हनुमान नगर शहा दू नगर जाण्यासाठी या जोड पुलाचा लाभ वाहतुकी ला होईल

नवीन पुलामुळे या वाहतुकअडचणीला पूर्णविराम मिळणार आहे.

स्थानिक आमदार सुहास कांदे या नी कामाची नुकतीच पाहणी केली असून, जुलै ऑगस्ट २०२५ पर्यंत पूल पूर्ण होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. अनुभवी ठेकेराराने हे कांम हाती घेतले आहे

महत्त्वाचे मुद्दे:

पुलाचे काम २४ तास सुरु
स्थानिक लोकांची पाठिंबा व आनंद
पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होणार सदर जोड पुल पूर्ण झाल्या वर हनुमान नगर व नांदगांव शहराचा नविन लुक बघायला मिळेल


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.