मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री पारखे मॅडम या 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या. त्यानिमित्ताने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,मा. उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना, पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, माजी मुख्याध्यापक फादर कोरिया,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना निकाळे मॅडम, फादर विवेक, सिस्टर अग्नेस, फादर सहाय्यराज,त्याचप्रमाणे श्रीमती पारखे मॅडम यांचे व्याही श्री व सौ हिवाळे दांपत्य,जावई श्री चंद्रकांत हिवाळे, मुलगी सौ. स्टेफी हिवाळे, मुलगा सिल्वस्टर पारखे, कुमारी पल्लवी व अपूर्वा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमती पारखे मॅडम यांचा शाळेच्या वतीने माननीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका व पर्यवेक्षक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सौ. अंजलीना झेवियर मॅडम यांनी आपल्या भाषणातून श्रीमती पारखे मॅडमच्या सेवेचा गौरव केला तर मुख्याध्यापक फादर माल्कम तसेच माजी मुख्याध्यापक फादर कोरीया यांनी आपल्या भाषणातून सौ. पारखे मॅडमच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक केले.आपल्या सत्काराला उत्तर देताना श्रीमती पारखे मॅडम यांनी शाळेप्रती, सर्व फादर सिस्टर व सहकारी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन श्री. सुनील कुमार कटारे सर व श्री विजय मोहिते सर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ योगिता गोडळकर मॅडम यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. हेमंत वाले सरांनी करून दिला.
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...










