loader image

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Jul 12, 2025


मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय

लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय

निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोज

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य घेऊन 111 वर्षाची शतकोत्तर वाटचाल मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 57 वर्षा पेक्षा जास्त कालावधी पासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि आजच्या सोशल मीडिया च्या काळात त्यांना विविध विषयात लेखन, करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहरात या आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत गत 57 वर्षात हजारो शालेय विध्यार्थी नी सहभाग घेतला आहे यंदाही हिच परंपरा पुढे सुरु ठेवत मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे रविवार दि.20 जुलै 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता छत्रे हायस्कुल येथे आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे तर विध्यार्थी मध्ये भाषण कला,वक्तृत्व कला वाढीली पाहिजे म्हणून आंतरशालेय कथाकथन स्पर्धा गुरुवार दि.31 जुलै 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता इंडियन हायस्कुल लोकमान्य सभागृह येथे व शुक्रवार दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 09-30 वाजता आंतरशालेय वक्तृत्व नियोजीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे विषय व नियमावली चे माहितीपत्रक मनमाड शहरातील सर्व माध्यमिक शाळांना पाठविण्यात आले असून स्पर्धे च्या सहभाग साठीची नावे ग्रंथपाल मनमाड सार्वजनिक वाचनालय यांच्या कडे शाळेमार्फत विद्यार्थ्यांनी नोंदवावी निबंध स्पर्धे साठी नोंदणी ची मुदत रविवार दिनांक 20 जुलै 2025 ला सकाळी 10 वाजेपर्यंत आहे तर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धे साठी शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 ला सायंकाळी 07 वाजे पर्यंत नोंदणी ची मुदत आहे या आंतरशालेय स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना व्यक्तिगत पारितोषिक रोख व पुस्तक /प्रमाणपत्र स्वरूपात देण्यात येईल तसेच या सर्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विध्यार्थ्यांना सहभाग प्रमाण पत्र देण्यात येईल या स्पर्धेत परीक्षकांन चा निकाल अंतिम राहील आणि तो सर्व स्पर्धकांन वर बंधनकारक राहील वक्तृत्व स्पर्धा झाल्या नंतर शुक्रवार दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी त्याच ठिकाणी मान्यवर प्रमुख पाहुणे च्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल तरी मोठ्या संख्येने या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा,संचालक नरेश गुजराथी माजी अध्यक्ष ,प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे,उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, आदींन सह संचालक मंडळाने केले आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.