loader image

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

Jul 13, 2025


. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.म्हणून मनमाड शहर भाजपा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंद जल्लोष साजरा करण्यात आला सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ला मान्यवरा च्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कीं जय, जय भवानी जय शिवाजी भारत माता कीं जय नरेंद्र मोदी तुम आगे बढो देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो अश्या घोषणा नि परिसर दुमदूमला त्यानंतर फटाक्याची आतिष बाजी करण्यात आली जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे या वेळी सर्व भारतीयांन साठी हा ऐतिहासिक आनंदाचा आणि गर्वाचा क्षण आहे यामुळे हिंदुस्थान चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाची आता विश्वाच्या इतिहास ऐतिहासिक नोंद झाली आहे असे सांगत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे आभार मानले या आनंद जल्लोष कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती दीपक गोगड, भाजपा व्यापारी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावात,जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, विजय मिश्रा, ऍड सुधाकर मोरे, संतोष जगताप,आनंद बोथरा भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे मन कीं बात चे दीपक पगारे, दिव्यांग आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता ताई वानखेडे, शहर उपाध्यक्ष गणेश कासार, कैलास देवरे, बुऱ्हाण शेख आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हितचिंतक व शिव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा शहर अध्यक्ष संदीप नरवडे, दीपक पगारे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.