loader image

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Aug 3, 2025

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक अनिल निकाळे सर होते. त्यांच्या समवेत शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो , उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना , कुमारी अनुष्का केदारे व कुमारी जान्हवी सांगळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कुमारी अनुष्का केदारे हिने आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली तर जान्हवी सांगळे हिने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याबद्दल आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल निकाळे सर यांनी लोकमान्य टिळकांचे ‘स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’ या विषयी तर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याची ओळख आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना करून दिली. आभार प्रदर्शन चंद्रशेखर चव्हाण या विद्यार्थ्याने केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा मुकुंद झाल्टे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.