loader image

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

Aug 5, 2025


मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे
नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ता शिंपी सचिव प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर जय भवानी व्यायामशाळेचे मोहनअण्णा गायकवाड मा नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे
स्पर्धा सकाळी ठीक ९ वाजता सुरू होणार असून आठ वजनी गटात स्पर्धक सहभागी होवू शकतात
४४ किलो ४८ किलो ५३ किलो ५८ किलो ६३ किलो ६९ किलो ७७ किलो व ७७ किलोवरील
सर्व वजनी गटातील विजयी खेळाडूंना पदक,प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येईल व सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जातील
स्पर्धेचे उद्घाटन सौ अंजुमताई सुहास कांदे चेअरमन समृद्धी सहकारी बँक सौ भाग्यश्री दराडे संचालिका सिद्धी क्लासेस व छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पोतदार यांच्या हस्ते करण्यात येईल


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
.