loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन दि.९ ऑगस्ट २०२५. रक्षा बंधन

Aug 8, 2025

सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ व अतूट नाते म्हणजे बहीण-भावाचे नाते. अनेक रुसवेफुगवे असून या नात्यातील प्रेम,जिव्हाळा,आपलेपणा,व मायेचा ओलावा कधी न कमी होणारा असे हे अतूट नाते.
परिस्थिती कशीही असो,,या नात्यातील प्रेमाला सीमा नसते. अठरा विश्व दारिद्र्य, डोक्यावर आभाळाची चादर व उद्याचा भाकरीचा प्रश्न आ वासून समोर असला तरी बहिण भावाचं एकमेकांवरील प्रेम व मायेचा ओलावा काही कमी होऊ शकत नाही. बहिण भावाच्या या मायेच्या ओलाव्याखाली अठराविश्व दारिद्र्याचे चटके सुद्धा सहजपणे शीतल होतात. दिस जातील,दिस येतील,, या गीता नुसार पुन्हा सुवर्ण जीवनाची पहाट उजाडेल या आशेने भाऊ बहिणीचा सांभाळ करतो व या सणाच्या निमित्ताने बहीण प्रेमाने भावाला राखी बांधते.
सर्व बहीण भावाच्या या अतूट प्रेमाला फलक रेखाटनातून शतशः नमन,,!!
– देव हिरे.(कलाशिक्षक,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ जून २०२४ ला नवीन शैक्षणिक वर्षाची...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड - नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम...

read more
.