सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ व अतूट नाते म्हणजे बहीण-भावाचे नाते. अनेक रुसवेफुगवे असून या नात्यातील प्रेम,जिव्हाळा,आपलेपणा,व मायेचा ओलावा कधी न कमी होणारा असे हे अतूट नाते.
परिस्थिती कशीही असो,,या नात्यातील प्रेमाला सीमा नसते. अठरा विश्व दारिद्र्य, डोक्यावर आभाळाची चादर व उद्याचा भाकरीचा प्रश्न आ वासून समोर असला तरी बहिण भावाचं एकमेकांवरील प्रेम व मायेचा ओलावा काही कमी होऊ शकत नाही. बहिण भावाच्या या मायेच्या ओलाव्याखाली अठराविश्व दारिद्र्याचे चटके सुद्धा सहजपणे शीतल होतात. दिस जातील,दिस येतील,, या गीता नुसार पुन्हा सुवर्ण जीवनाची पहाट उजाडेल या आशेने भाऊ बहिणीचा सांभाळ करतो व या सणाच्या निमित्ताने बहीण प्रेमाने भावाला राखी बांधते.
सर्व बहीण भावाच्या या अतूट प्रेमाला फलक रेखाटनातून शतशः नमन,,!!
– देव हिरे.(कलाशिक्षक,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)

राशी भविष्य : १८ सप्टेंबर २०२५ – गुरुवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...