loader image

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

Aug 13, 2025


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश जेजुरकर, उपप्राचार्य प्रा.डॉ. बी एस देसले यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑगस्ट या जागतिक युवा दिनानिमित्त विविध संदेशात्मक रांगोळी, पोस्टर्स त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी व्यसनमुक्ती वरचे पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी एनएसएस स्वयंसेविकांनी ‘संयम पाळा, एचआयव्ही टाळा’ ‘एच आय व्ही मुक्त देश बनवूया, आपले जीवन सुरक्षित बनवूया’, रक्तदान श्रेष्ठ दान, धूम्रपानाचे धोके,अशा विविध पोस्टर्स व रांगोळी द्वारे जनजागृती केली. सन २०२५-२६ च्या जागतिक युवा दिनाची संकल्पना “शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी स्थानिक युवा कृती”ची पथनाट्यच्या माध्यमातून सादरीकरण करत असताना आजची युवा पिढी धूम्रपान, ड्रग सेवन, रेव पार्टीच्या माध्यमातून यौवन संबंध, एकमेकांचे वापरलेले इंजेक्शनद्वारे ड्रग सेवन यातून एचआयव्हीचा धोका वाढू शकतो आणि ते समाजाच्या आरोग्यासाठी ही धोक्याचे आहे, अशी भरकटलेली युवा पिढी देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याची आहे. शाश्वत विकासासाठी आपण महापुरुषांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे. याचे उत्कृष्ट सादरीकरण त्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून केले. यावेळी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी व्ही सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे लॅब टेक्निशियन श्री जितेंद्र बिरारी, समुपदेशक निलेश मोरे , रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, प्रा. सोमनाथ पावडे, प्रा. विजया सोनवणे सह प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते. पथनाट्याची सांगता धूम्रपान निषेधची शपथ देवून करण्यात आली.रॅली यशस्वीतेसाठी रेड रिबन क्लब व एन एस एस स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.