15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस आपल्याला त्या वीरांच्या त्यागाची आठवण करून देतो ज्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे हा दिवस एक उत्सव नसून आपल्यासाठी प्रेरणा आहे.
स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रात देशाने दैदिप्यमान प्रगती साधली, विविध आव्हानांना तोंड देत यशस्वीतेने सामोरे जात देशाच्या संरक्षण हितासाठी सीमेवर देश रक्षणाची जबाबदारी आपल्या सैन्याने चोख बजावली आहे.
‘कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमाँ हमारा |’ काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी भ्याड हल्ला करत अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला या हल्ल्यास प्रतिउत्तर करत भारताने 7 मे 2025 पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करून पाकिस्तानी दहशतवादी ठार करत सडेतोड उत्तर देत निष्पाप पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला.
या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ऑपरेशन सिंदूर ची संपूर्ण माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तमरीत्या मांडली. सोफिया कुरेशी या संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत भारतीय तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय महिला शक्ती या भ्याड कृत्यांना उत्तर देण्यासाठी परिपूर्ण आहेत हेच भारताने जगाला दाखवून दिलं. आधुनिक भारतीय महिलाशक्तीचे हे उत्तम उदाहरण आहे.
!!जय हिंद !!
स्वातंत्र्य दिनानिमित्त नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. च्या शालेय दर्शनी फलकावर याबद्दलचे बोलके फलक रेखाटन कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी रेखाटले आहे.