Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बुरुकुल वाडी प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस; नागरिक त्रस्त

Aug 31, 2025

मनमाड :
बुरुकुल वाडी प्रभाग क्रमांक दोन परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तब्बल पंधरा ते वीस कुत्र्यांचे टोळके एकत्र फिरत असून ते अक्षरशः पाळीव कोंबड्या, बकऱ्या यांना फाडून खात आहेत. इतकेच नव्हे तर लहान मुलांवर व नागरिकांवर हल्ला करून जखमी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या प्रकाराची माहिती प्रशासनाला कळवूनही अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे स्त्रिया, शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिक बाहेर पडताना घाबरत आहेत.

या गंभीर समस्येकडे नगरपालिकेने तातडीने लक्ष घालावे, मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना मनमाडचे उपशहर प्रमुख संजय दराडे यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]