नवरात्रोत्सव २०२५ नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. नवरात्री हा देवी दुर्गा मातेला समर्पित असलेला नऊ रात्रींचा (आणि दहा दिवसांचा) एक हिंदू सण आहे, जो देवीच्या विविध रूपांची पूजा आणि तिच्या राक्षसांवरील विजयाचा उत्सव साजरा करतो. हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो – चैत्र महिन्यात आणि अश्विन महिन्यात (ज्याला शारदीय नवरात्र म्हणतात). या काळात देवीची पूजा, उपवास, आणि विविध धार्मिक विधी केले जातात. महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व असून, घटस्थापना करून घरात समृद्धीचे प्रतीक म्हणून धान्य आणि पाणी भरलेले पात्र ठेवले जाते. सप्तश्रुंगी देवी नाशिक जवळील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वणी गडावर असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठापैकी एक आद्य स्वयंभू शक्तीपीठ मानले जाते. जे देवीच्या महिषासुर मर्दिनी रूपाचे प्रतीक आहे. ही ८ फूट उंचीची १८ हातांची सिंदूर लेपित प्रतिमा व प्रसन्न मुद्राचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भावीक सप्तशृंगी गडावर येतात. या नवरात्री निमित्त भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक चे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनी रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटनातून आई सप्तश्रुंगी माते चे सुंदर रूप रेखाटून सर्व भाविकांना नवरात्रीच्या भक्तिमय व शक्तिमय शुभेच्छा दिल्या आहेत. ||जगदंब ,,,,जगदंब ||













