loader image

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये माता पालक सभा संपन्न

Sep 26, 2025


मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये माता पालक सभा संपन्न झाली‌. या सभेस उद्बोधन करण्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून इंडियन हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षिका सौ. विजया घायाळ उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित मातांना आपल्या मुलाबाळांचे संगोपन कसे करावे, अभ्यास कसा करून घ्यावा, संस्कार कसे करावेत, याबद्दल कृतीयुक्त भाषणातून माहिती दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रेव्ह .फादर मेल्कम , उप मुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना, पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर, त्याचप्रमाणे माता-पालक सभेच्या उपाध्यक्षा सौ. नीलम अग्रवाल, दामिनी पथकातील सदस्या श्रावणी मॅडम व राजेश्वरी मॅडम आदी मान्यवर या सभेस उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती वाघ मॅडम यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय सौ.रोहिणी जाधव मॅडम यांनी करून दिला. माता पालक सभेच्या कार्यकारणी चे वाचन श्रीमती सरिता देवरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ. माया शिंदे मॅडम यांनी केले. या सभेच्या निमित्ताने , ‘जागर- नारी शक्तीचा’ हे प्रबोधनपर पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यात शाळेतील सौ. अंजलीना झेवियर, सौ.लीना जाधव, सौ. मनीषा पानपाटील, सौ.एलिझाबथ शेल्टे, सौ. योगिता गोडळकर, सौ.रचना आहिरे या शिक्षिका तसेच कुमारी स्वामिनी कातकडे, कोमल उगले, कृतिका कारंडे, आरोही झोडपे ,मयुरी जाधव ,श्रेया सानप या विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी चटपटीत सवांदाद्वारे व उत्कृष्ट अभिनयाद्वारे उपस्थित माता-पालकांची मने जिंकलीत.


अजून बातम्या वाचा..

.