loader image

मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा

Sep 26, 2025


मनमाड: दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुभाष अहिरे यांनी आपल्या व्याख्यानातून,
मानवी आरोग्य टिकविण्यासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ परिसर तसेच प्रदूषणामुळे दमा, श्वसनाचे विकार, त्वचारोग, पाण्यातून पसरणारे रोग, तसेच हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या झपाट्याने वाढत आहेत. पाणी, हवा आणि अन्नाची गुणवत्ता थेट मानवी आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच आपल्याला निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे वक्ते प्रा पी. व्ही. आहिरे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण व आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मनोगतातून, आपण सर्वांनी मिळून वृक्षारोपण, पाणी बचत, प्लास्टिक कमी वापरणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्वच्छता राखणे या छोट्या गोष्टी अंगीकारल्या, तर आपण पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी पृथ्वी निर्माण करू शकतो असा संदेश दिला.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा विठ्ठल फंड, कला शाखेचे प्रा उज्वल बच्छाव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील बच्छाव तर आभार प्रा. राजेंद्र बागुल यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थ्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
.