Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज

Oct 16, 2025

आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज
प्राचार्य डॉ. अरुण पाटील
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. किरण पिंगळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. किरण पिंगळे यांनी आपल्या व्याख्यानातून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे कारण कलाम यांचे वाचनावर असलेले प्रेम हे आहे. या निमित्ताने त्यांनी वाचनाचे महत्त्व, वाचनातून विद्यार्थ्यांमध्ये घडून येणारे सकारात्मक बदल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करावयाचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही असे त्यांनी नमूद केले. आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून पुढे येतो आहे अशा वेळेस मोबाईल फक्त बघणे नाही तर त्या माध्यमातूनही आपण वाचन संस्कृती रुजू शकतो असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगतातून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थी दशेपासून वाचन केलं. त्यातून त्यांना देशाच्या संरक्षण क्षेत्राबद्दलची माहिती मिळाली. त्यातूनच त्यांनी पुढे क्षेपणास्त्रामध्ये क्रांतिकारक बदल घडविले आणि पूर्ण जगाला एक मिसाईल मॅन म्हणून आपली ओळख निर्माण करून दिली. विद्यार्थ्यांना वाचनावर लक्ष केंद्रित करून आपला व्यक्तिमत्व विकास साध्य करता येईल आणि भविष्यात देशाचे तंत्रज्ञान अधिक प्रगत करण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांवर आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श आपण समोर ठेवून आपण मार्गक्रम केले पाहिजे आणि अधिकाधिक वाचन करून आपण स्वतःला समृद्ध करून घ्या. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वाचन प्रेरणा दिनाचे अवचित्त साधून ग्रंथालय विभाग व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयात विविध विषयावरील 350 पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री सुभाष अहिरे, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. राहुल लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. व्ही. आर. सातपुते व आभार श्रीमती एस. एन. निकम यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]