loader image

संवेदनशील दीपावली फलक रेखाटन

Oct 19, 2025

दिवाळी भारतातील सर्व धर्मियांचा सर्वोच्च सण आहे. रोषणाई,उल्हास,प्रेम,मैत्री,व मानवतेने भरलेला तेजोमय उत्सव म्हणजे दीपावली.
हा सण व उत्सव साजरा करताना आपण आपले घर नक्कीच प्रकाशमय करा पण आपल्या सभोवती बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरिबां विषयी मानवी संवेदना जागृत नक्की ठेवा.
दीपावली साठी आपण ऑनलाईन व मोठमोठ्या मॉल ,दुकानांमधून वस्तूंची खरेदी करतो, पण त्याच दुकानाबाहेर रस्त्यावर, फुटपाथवर काही छोटे दुकानदार, गरीब मुलं, पुरुष व स्रिया दिवाळीचे साहित्य विकताना आपण बघतो. कारण नसतांनाही आपण काही साहित्य यांकडून विकत नक्की घ्या. कारण तुमच्या काही पैशांनी त्यांच्याही घरी दिवाळी साजरी होईल. हे रस्त्यावरील छोटे विक्रेते श्रीमंत होण्यासाठी नाही,तर जगण्यासाठी धडपड करत असतात.
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या या गरिबांप्रति मानवी संवेदना जागृत ठेवणे हीच खरी दिवाळी व हेच खरे लक्ष्मी पूजन ,आणि याच खऱ्या दीपावली च्या मंगलमय संवेदनशील शुभेच्छा असतील.
रंगीत खडू माध्यमातील हे संवेदनशील फलक रेखाटन नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.या शाळेचे कला शिक्षक श्री.देव हिरे.यांनी फलकावर रेखाटले आहे. या फलक रेखाटनातून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक संवेदनात्मक शुभेच्छा !

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.