loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

Dec 18, 2025


मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. सदरहू विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी परीक्षक म्हणून सौ प्रेम लता गायकवाड मॅडम (ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका इंडियन हायस्कूल मनमाड)तसेच श्री वसंत करबट सर, माननीय फादर लॉईड, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना, माननीय पर्यवेक्षक श्री अनिल निकळे सर व सर्व विज्ञान शिक्षक व सहभागी स्पर्धक विद्यार्थी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माया शिंदे मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ. अंजलीना झेवियर मॅडम यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन श्री. स्वप्नील बाकळे सर यांनी करून दिली. परीक्षक म्हणून उपस्थित असणाऱ्या सौ.गायकवाड मॅडम व करबट सरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तीन गटात घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे-
*मोठा गट*(नववी, दहावी) प्रथम क्रमांक- स्वामी ज्ञानेश्वर काळे व रितेश राजू बागुल ( होलोग्राम ),द्वितीय क्रमांक- मयुरी त्रिलोक जाधव व आराधना अविनाश हिवाळे (ब्लड ग्रुप टेस्ट ),तृतीय क्रमांक- आरती वसंत आहिरे व हर्षु चंद्रकांत सांगळे (पावसापासून संरक्षण) *मध्यम गट* (सातवी आठवी), प्रथम -साई योगेश टिंबर (बायोगोस मॉडेल), द्वितीय क्रमांक- समर्पित हनुमंत सोनवणे व साई पवन वैद्य (होम सेक्युरिटी), तृतीय क्रमांक-वेद योगेश अमृतकर (टेस्ला मॉडेल) *लहान गट* (पाचवी, सहावी) प्रथम क्रमांक- प्रज्वल आनंद बोथरा व श्रीरंग महेंद्र पद्मने (नैसर्गिक संसाधने वापर ),द्वितीय क्रमांक- समर्थ दुर्गेश डिंबर (मायक्रोस्कोप), तृतीय क्रमांक -श्लोक अरविंद तिरूख( स्मार्ट सिटी)
या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सौ.अंजनीला झेवियर मॅडम,श्री. प्रकाश नान्नोर सर, श्री महेश भोसले सर,श्री. अरविंद दळवी सर व इतर सर्व विज्ञान शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.