Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सरदार पटेल रोडचे ‘शुक्लकाष्ट’ कधी संपणार?

Jan 8, 2026

मनमाड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या सरदार पटेल या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून मुख्य बाजारपेठेतील जवळ जवळ सर्वच रस्त्यांची कामे झालेली असली तरी सरदार पटेल रोडचे काम अद्याप का होत नाही ? असा सवाल सरदार पटेल रोडवरील व्यापारी तसेच नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मनमाड रेल्वे स्थानक ते प्रगती कॉर्नर ह्या रस्त्याची झालेली दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि धुळीचे प्रचंड साम्राज्य या विवंचनेतून आपली सुटका कधी होईल? असा प्रश्न या भागातील रहिवाशांना सतावत आहे. मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा प्रमुख मार्ग असून रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे आणि धुळीचे असलेले साम्राज्य या प्रमुख कारणांमुळे शहरातील नागरिकही या रस्त्याने जात नसल्यामुळे या मार्गावरील दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.

नगर प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा ज्या दिवशी होतो तेव्हा रस्ता पूर्णपणे जलमय होतो व त्यामुळे रस्त्यातील खड्डे लक्षात न आल्याने अनेक अपघात घडतात. माणके कंपाउंड मधील जैन बांधवाना जैन स्थानकात जाण्यासाठी रोजच या मार्गाचा वापर करावा लागतो मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी प्रामुख्याने या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरू करतील आणि त्यांच्या रोजच्या जीवनातील दयनीय अवस्थेत असलेला खड्डेमय रस्त्याचे शुक्लकाष्ट संपवतील असा आशावाद ह्या परिसरातील नागरिक,ज्येष्ठ नागरिक, व्यापारी शाळकरी विद्यार्थी आणि जैन स्थानकात जाणाऱ्या भाविकानी व्यक्त केला आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]