loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

Jan 11, 2026


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलीत, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे १२५ स्वयंसेवकांकडून निमोण येथे श्रमदान करून संपन्न झाले.

समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निमोणच्या सरपंच डॉ.स्वाती देवरे यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एस.देसले, कुलसचिव समाधान केदारे हे देखील उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी तीन वनराई बंधारे, गावातील झाडांना गेरू व चुना लावणे, शालेय परिसराची व ग्राम स्वच्छता, ग्रामविकास सर्वेक्षण, शेतकरी सर्वेक्षण, डॉ. स्वराली चोपडा यांचे महिला सबलीकरण व आरोग्य जनजागृती या वरील व्याख्यान, डॉ. विद्या मगर यांचे महिलांचे आरोग्य व आहार यावरील मार्गदर्शन, डॉ.आर एस काळे यांचे पर्यावरण, जैवविविधता आणि अधिवास संवर्धन यावरील व्याख्यान तर डॉ. रोहित शिंदे यांचे सौर ऊर्जा काळाची गरज यावरील व्याख्यान, एचआयव्ही समुपदेशक श्री. निलेश मोरे यांचे मार्गदर्शन, यासारख्या विविध उपक्रमांवर श्रमसंस्कार व जनजागृती करून शिबीर यशस्वी झाले.

यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्रामुख्याने ‘युवकांमध्ये खरे श्रम संस्काराचे महत्त्व समजावणारी योजना म्हणजे एनएसएस’, ‘देश घडवण्यासाठी वाचन संपन्न, इच्छाशक्ती संपन्न व कार्यसंपन्न युवकांची आज आवश्यकता आहे, यासाठी युवकांनी अशा योजनांमध्ये सहभागी व्हावे’ यावर भर देण्यात आला . ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ.बी. एस.देसले तसेच निमोण गावच्या सरपंच डॉ.स्वाती भाऊराव देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

शिबिरासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, प्रा. सोमनाथ पावडे, डॉ.आरती छाजेड यांनी परिश्रम घेतले. प्रा राजेंद्र बागुल, प्रा अनिल शिरसाट, प्रा सविता पवार, तसेच जि प मराठी शाळा, निमोण यांचेही सहकार्य लाभले.यावेळी महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे, पर्यवेक्षक प्रा. डी व्ही सोनवणे, कनिष्ठ विभागाचे उप प्राचार्य प्रा.सुभाष अहिरे सह गावातील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी यांनी या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली घुगे व योगिनी डुकळे हिने केले.


अजून बातम्या वाचा..

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम  स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या स्वच्छ...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
.