loader image
[ays_poll id=7]

युवा फाउंडेशन आयोजित ”नांदगाव रन” मध्ये शेकडो नांदगावकरांचा सहभाग

Jan 11, 2026


नांदगाव (सुमितकुमार जगधने) :-  राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव येथील युवा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 11 जानेवारी रोजी सकाळी संपन्न झालेल्या या स्पर्धेत 350 पेक्षा जास्त नांदगावकरांनी आपला सहभाग नोंदविला. नांदगावमध्ये प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मविप्र महाविद्यालय मनमाड रोड येथून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे व उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव दर्शन दुग्गड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू निकम सर, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, आंतरराष्ट्रीय धावपटू भिकूसर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवून व हवेत फुगे सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला व त्यानंतर बक्षीस वितरण करून राष्ट्रगीताने स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

पुरुष गटात रवींद्र दयाराम चव्हाण – प्रथम, शशिकांत भगवान गोटे – द्वितीय तर कुणाल कैलास जूनधारे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. महिला गटात कु.तपस्या अहिरे – प्रथम, कु.कल्याणी दुरडे – द्वितीय तर योगिता हाटकर यांनी तृतीय क्रमांक पटकविला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी युवा फाउंडेशनतर्फे केतन करवा, अंकुश सुराणा, संदीप पाटील, सुमित सोनवणे, सुमित गायकवाड, प्रसाद वडनेरे, मयूर दाभाडे, सिद्धेश सोनवणे, सुरेश देसले, ओम ठाकूर, निलेश पाटील, गोलू बोरसे आदींनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
.