loader image
[ays_poll id=7]

वंजारवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

Jan 12, 2026

वंजारवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार जेष्ठ नागरिक जगन्नाथ गुंडगळ व शहाजी जाधव यांच्या हस्ते अर्पण करून करण्यात आली.

जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक अनिल बोरसे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा घडवून स्वराज्याची पायाभरणी कशी केली, याचा प्रेरणादायी आढावा घेतला. त्यांच्या विचारांतून राष्ट्रप्रेम, संस्कार, शौर्य वारसा मिळतो, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी माजी सरपंच शंकर गुंडगळ, ग्रा. प. उपसरपंच संतोष पवार, छबू गायकवाड, तुकाराम गुंडगळ, कृष्णा पावडे, दौलत गांगुर्डे, ग्रा. प. सदस्य अनिल दखने, प्रकाश सावंत, शहाजी खैरनार, ज्ञानदेव गुंडगळ, भाऊसाहेब चव्हाण, शिवाजी शिंदे, विश्वनाथ शिंदे, दशरथ जाधव, संजय गुंडगळ, चिंधु गुंडगळ, मारुती जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी गोरख गुंडगळ, समाधान गायकवाड, नितीन जाधव तसेच वंजारवाडी येथील युवक व नागरिकांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.