Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

Jan 17, 2026

नांदगांव : सुमितकुमार जगधने

नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट नुकतीच पार पडली. राज्याचे संकटमोचक मंत्री आणि भाजपचे प्रमुख रणनीतीकार गिरीश महाजन यांची विविध पक्षांतील व युवा नेतृत्वातील स्थानिक नेत्यांनी अचानक भेट घेतल्याने आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीत मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, स्वीकृत नगरसेवक दत्तराज छाजेड आणि शिवसेना (युवा सेना) जिल्हा युवा नेते फरहान खान सहभागी होते. वेगवेगळ्या राजकीय प्रवाहातील नेते एकाच व्यासपीठावर दिसल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मनमाड–नांदगाव परिसरातील पाणीटंचाई, रखडलेली विकासकामे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे चर्चेचे मुख्य मुद्दे होते. विशेष म्हणजे, थेट कॅबिनेट मंत्र्यांशी साधलेला हा संपर्क स्थानिक पातळीवर मोठ्या राजकीय हालचालींचा संकेत मानला जात आहे.

युवा नेते फरहान खान यांची उपस्थिती ही आगामी काळात तरुण मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्याची रणनीती असल्याचेही बोलले जात आहे. महायुतीतील स्थानिक समन्वय अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने ही भेट निर्णायक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही केवळ सदिच्छा भेट नसून, मनमाड–नांदगावच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवसांत या भेटीचे पडसाद स्थानिक राजकारणात स्पष्टपणे उमटण्याची चिन्हे आहेत.

अजून बातम्या वाचा..

खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या दक्षिण व पच्छिम विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कला...

read more
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे  आमरण उपोषण, आज हुतात्मा चौकात आत्मदहणाचा इशारा

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे आमरण उपोषण, आज हुतात्मा चौकात आत्मदहणाचा इशारा

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]