नांदगांव : मारुती जगधने नांदगांव ४० गांव नॅशनल हायवे सुस्थितीत झाल्याने या मार्गावरील रहदारी चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे वाहनांची गती रोखण्यासाठी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग NH ७५३. नांदगांव ते ४० गांव या मार्गावर म्हसोबाबारी पोखरी जवळ ४० गांव फाटा ,व याच मार्गावर पिंपरखेड चौफुलीवर या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी आघाडीचे प्रमुख निलेश चव्हाण यांनी केली आहे .
दरम्यान नांदगांव ४० गांव हायवेवरील रहदारी बघता शालेय विद्यार्थी यांना शालेय रस्ता ओलांडताना वेगाने चालनारी वाहनांची गती कमी करणेसाठी नांदगांव ४० गांव रोडवर पिंपरखेड चौफुली जवळ गतिरोधक टाकावे तसेच नांदगांव पासून ५ कि मी अंतरावरील पोखरी म्हसोबा बारीत ४० गांव फाट्यावर वाहनांची गती रोखण्यासाठी गतिरोधक टाकवे अशी मागणी करण्यात आली अाहे या संदर्भातील निवेदन सा बा विभाग, तहसीलदार यांना देण्यात आले आहे .
नॅशनल हायवेवर लागू करण्यात आलेले रबरी गतिरोधक बसवण्याची मागणी होत आहे .
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...









