loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 27, 2026


मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या एसपीजी कमांडो म्हणून पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे कार्यरत असणारे श्री. जनार्दन मोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक श्री. अनिल निकाळे सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना निकाळे मॅडम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. मुकुंद झाल्टे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.निलम अग्रवाल,माजी नगरसेविका सौ. मोरे मॅडम, दामिनी पथकातील पदाधिकारी राजश्री मॅडम आणि श्रावणी मॅडम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सामूहिक रित्या गायिले गेले तर संविधान वाचन ,ध्वज प्रतिज्ञा, प्रतिज्ञा आदींचेही सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले. त्यानंतर श्री सुधाकर कातकडे, श्री. परविंद्रसिंग रिसम , श्री. दत्तू जाधव,श्री. स्वप्नील बाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलनाद्वारे उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. तर सौ. अंजलीना झेवियर मॅडम व श्री. अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. श्रीमती स्नेहल कैलास पाईकराव व सौ. आरती चेतन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर छान नृत्य करून वातावरण भारावून टाकले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी माधुरी आहिरे हिने केले. कु.सिद्धार्थ माळी, आदित्य गायकवाड ,प्रचिती लोहकरे व श्रद्धा दराडे या विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत शपथ देण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना साक्षरतेचीही शपथ देण्यात आली. संविधान व प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कुमारी श्रद्धा मुकुंद झाल्टे हिने आपल्या भाषणातून विषद केले. आभार प्रदर्शन सौ. ज्योती वाघ मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री. वसंत करबट यांनी करून दिली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे माननीय मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच देशाच्या विकासासाठी आपल्यालाही योगदान देता येईल असे शिक्षण घ्या,असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.