Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

Feb 25, 2026

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य गुरुद्वारा असून येथे देशातील अनेक राज्यातून शिख बांधव आणि विविध जाती,धर्म आणि पंथातील भाविक नियमित येत असतात.

शिख धर्मामध्ये ‘गुप्तसर साहिब गुरुद्वारा’ नावाने मनमाड गुरुद्वाराची ओळख असून गुरुद्वाराला मोठा धार्मिक इतिहास देखील आहे. सध्या मनमाड गुरुद्वाराच्या नवीन
दरबाराचे काम सुरु असून भव्य स्वरूपात नवीन गुरुद्वाराची निर्मिती होत आहे.भविष्यामध्ये भव्य आणि तितक्याच आकर्षक पणे निर्माण होणाऱ्या या नवीन गुरुद्वारा मुळे मनमाड शहराची आणखी एक नवीन ओळख ही शिख धार्मियांचे तीर्थस्थळ म्हणून होईल यात शंका नाही.

मनमाड गुरुद्वारामध्ये नेहमीच शिख धर्मीय भाविकांन बरोबरच इतर धर्मीय भाविक देखील येत असतात, परंतु अनेक वेळेला असे आढळून येत आहे की काही भाविकांनकडून गुरुद्वारातील नियमांचे पालन न करता येथील पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो.

या विषयी मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांनी गुरुद्वारामध्ये येणाऱ्या भाविकांनी आवाहन केले आहे की, मनमाड गुरुद्वारामध्ये शिख बांधवांन बरोबरच समाजातील सर्व जाती,धर्मीय आणि प्रत्येक घटकांचे सदैव स्वागतच आहे, गुरुद्वारामध्ये अनेक वेळेला साजरे होणारे धार्मिक उत्सव, लंगर-प्रसाद यात भाविकांनी सहभागी होऊन यांचा लाभ घ्यावा, परंतु यात सहभागी होतांना गुरुद्वाराच्या नियमांचे पालन करून येथील पावित्र्य भंग होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.

गुरुद्वाराच्या परिसरामध्ये प्रवेश करतांना भाविकांनी आपल्या डोक्यावर कपडा बांधणे, कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ, गुटखा,दारू यांचे सेवन करून आतमध्ये न येणे, गुरुद्वारामध्ये साजऱ्या होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त गुरुद्वारा परिसराध्ये इतर कोणत्याही प्रकारचे फोटो शुट अथवा रील काढू नये, पारंपारीक कपडे परिधान करणे इत्यादी प्रकारच्या नियमांचे भाविकांनी पालन करून गुरुद्वाराचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हान गुप्तसर साहिब गुरुद्वारा मनमाडचे प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड कारखाना शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन...

read more
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १० वाजेपर्यंत ची आकडेवारी

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १० वाजेपर्यंत ची आकडेवारी

सहकारी संस्थेचा मतदार संघ एकूण मतदान २९५ झालेले मतदान १२० ४०.६८% ग्रामपंचायत मतदार संघ एकूण मतदान...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटा तर्फे मनमाड पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटा तर्फे मनमाड पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

मनमाड- शहरामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]