loader image
[ays_poll id=7]

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न. – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

Mar 3, 2026

मनमाड (प्रतिनिधी)-
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी उत्साहात संपन्न झाली. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री.सदाशिव सुतार सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनमाडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.योगेश पाटील उपस्थित होते.
सेंट झेवियर्स हायस्कूलची कु.श्रद्धा शिंदे हि ने प्रथम पुरस्कार (११००/- रु. रोख,सन्मानचिन्ह व गौरवपत्र) पटकाविला तर द्वीतीय पुरस्कार(७००/- रु. रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र) कवी रविंद्रनाथ टागोर शाळेच्या कु. श्रावणी खैरनार हिने पटकाविला.
तर तृतीय पुरस्कार (५००/- रु. रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र)छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या कु. आदिती पाटील हिने पटकाविला.
या स्पर्धेत कवी रविंद्रनाथ टागोर शाळेच्या
कु.सई शाकद्वीपी व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कु. नम्रता पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक(२००/- रु. रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र) देण्यात आले. छत्रे न्यू इंग्लिश स्कुलच्या कु.वैष्णवी सानप हिच्या कवितेस लक्षवेधी बाल- कुमार कवयित्री हा विशेष पुरस्कार देण्यात आला.
या काव्यस्पधेचे परीक्षक म्हणून कवयित्री सौ.मंदोदरी पाटील, कवी श्री.प्रदीप गुजराथी व युवाकवी श्री.शांताराम वाघ यांनी काम पाहिले.
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापुजनाने मान्यवरांच्या हस्ते या काव्यस्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. युवा गायक आर्यन जोगदंड याने शुभारंभ प्रसंगी मराठी भाषा गौरवगीत गायन केले.
शहरातील दोनशेहून अधिक शालेय बाल-कुमार कवी कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी चौदा बाल-कुमार कवीच्या कवितांची निवड कविता सादरीकरणासाठी करण्यात आली होती.
मनमाड साहित्य संघाचे कार्यवाहक श्री. अमोल खरे यांनी याप्रसंगी प्रास्ताविक केले.
मनमाड साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ.रविन्द्र सुर्वे, कवी श्री.डी.डी.पाटील, श्री. डी.टी.पवार,संघाचे मार्गदर्शक पत्रकार नरेश गुजराथी, प्रा.श्री. जे.वाय.इंगळे कवी व प्रकाशक श्री.संदीप देशपांडे,श्री.राम महाले, नगरसेवक श्री.विशाल आहिरे आदी मान्यवर याप्रसंगी मंचावर उपस्थित होते.
हेमंत वाले,उपाली परदेशी,सुरेंद्र भुजंग, प्रिया परदेशी,श्री.भाऊसाहेब दाभाडे यांनी कार्यकमाचे संयोजन केले तर मनमाड साहित्य संघाचे सचिव कवी जनार्दन देवरे यांनी कार्यक्रामाचे सूत्रनिवेदन केले. कार्यक्रमास विविध शाळांचे मुख्याध्यापक, समन्वयक शिक्षक,पालक व
विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.