loader image
[ays_poll id=7]

19 वर्षात दहा हजार पेक्षा जास्त रुग्णाची मोफत निःस्वार्थ सेवा .

Mar 31, 2026


मनमाड शहर तस राजकीय, सामाजिक, साहित्य, क्रीड़ा,शैक्षणिक,कला,व्यापार कामगार चळवळ , धार्मिक, सांस्कृतिक, महिला, रेल्वे,विविध आंदोलने, स्पर्धा,मिरवणूका , कार्यक्रम ,मोर्चे, या विषय साठी नेहमी प्रसिद्धित राहते पण या सर्व प्रसिद्धि पासून कोसो दूर राहून अखंडित पणे गेल्या 19 वर्षा पासून निस्वार्थ ,व निरपेक्ष भाव ठेवून लोक कल्याणार्थ सेवा वृत्ती ने आरोग्य, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे❗ ” आनंद सेवा केंद्र “❗ मनमाड शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्या निःस्वार्थ सेवा कार्याची एक स्वतंत्र आणि आदर्श ओळख निर्माण करणाऱ्या ….. आनंद सेवा केंद्र ….. 19 वर्षा पूर्वी भगवान महावीर यांचे जन्म दिना निमित्ताने भगवान महावीर यांचा आदर्श समोर ठेऊन लोक सेवेची, आरोग्य सेवेची निस्वार्थ वृत्ती असणाऱ्या गौतम संचेती, कल्पेश बेदमुथा, ,भिकचंद नाभेड़ा, योगेश भंडारी, ऍड.संजय गांधी दिपक शर्मा, अमोल देव, विनय सोनवणे अनुप पांडे ललित धांदल यांचे सहअनेक नावे आहेत एकत्र येऊन 2007 साली आनंद सेवा केंद्र स्थापन केले लोक सेवेचे आरोग्य सेवेच्या व सामाजिक सेवेच्या ह्या लावलेल्या रोपाने आता वृक्षा चा आकार घेत म्हणता म्हणता दीड तप म्हणजे 19 वर्षपूर्ण केलीआहेत गत 18 वर्षात अखंडीत पणे सातत्याने भगवान महावीर यांच्या जन्म दिनी दरवर्षी ❗भव्य रक्तदान शिबिराचे❗ आयोजन करून आता पर्यंत 18 वर्षात 3000 पेक्षा जास्त रक्त बाटल्या संकलित करुन गरीब रुग्णा ना दिल्या आहेत एवढ्या रक्त बाटल्या संकलित करण्याचा विक्रम देखील आनंद सेवा केंद्र च्या नावावर आहे विशेष म्हणजे आनंद सेवा केंद तर्फे रुग्ण सेवेचे साहित्य गरीब रुग्णा साठी मोफत उपलब्ध करून दिले जाते ,आज पर्यंत शेकडो नी या सेवेचा लाभ गरीब व गरजू रुग्णा ना मिळाला आहे कोविड सारख्या संकट काळात आनंद सेवा केंद्र एक आरोग्य दूत बनून मनमाड व ग्रामीण भागातील रुग्णा साठी आधार ठरले 40 पेक्षा जास्त ऑक्सीजन मशीन मोफत उपलब्ध करून देण्यात आले याच कोरोना काळात स्वतः जिवा ची पर्वा न करता आनंद सेवा केंद्र च्या सेवाव्रती सदस्य नी रुग्णाना प्रत्यक्ष जाऊन मदत केली आरोग्य संबंधी जनजागृति व्हावी म्हणुन आनंद सेवा केंद्रा तर्फे आरोग्य क्षेत्रातील मान्यवर चे मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित सतत करण्यात येते, आपण देशाचे जागरूक नागरिक आहोत आपले देशा प्रति समर्पण भाव ठेऊन 2024 लोकसभा निवडणूक /2024 विधानसभा निवडणूक /2025 मनमाड नगरपरिषद निवडणुकीत मनमाड शहरातील 73 पेक्षा जास्त मतदान केंद्रा वर आजारी आणि दिव्यांग मतदारा साठी मोफत व्हिल चेअर उपलब्ध करून देत आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले पण हे सर्व सेवा कार्य करताना आनंद सेवा केंद्र जात, धर्म, पंथ,गरीब, श्रीमंत असा भेद न करता मात्र भगवान महावीरांनी सांगितलेल्या लोक कल्याण मार्गावर कार्यरत आहेत आज आनंद सेवा केंद्रा कडे 30 पलंग /25 व्हिल चेअर /60 वॉकर /35 कमोड चेअर /20ऑक्सीजन मशीन या वस्तू 24 तास रुग्ण सेवे साठी मोफत उपलब्ध आहेत अनेक दानशुर सढळ हाताने या कार्यास ऐच्छिक मदत करतात त्याच्या सहकार्य ने या रुग्ण सेवा वस्तूमध्ये सतत वाढ होत आहे आनंद सेवा केंद्रा चे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा यांनी सर्वांच्या सहकार्य ने आनंद सेवा केंद्र भविष्यात रुग्णा साठी मोफत उपचार शिबीर, मोफत रुग्णवाहिका, मोफत औषध देण्याचे उपक्रम करणार असल्याचा मानस व्यक्त करतात सध्या च्या फेसबुक, व्हाट्स एप्प, च्या सोशल मीडिया च्या जमान्यात सर्वच क्षेत्रातील संस्था, संघटना, आणि व्यक्ति प्रसिद्धि साठी, आणि नाव मोठे होणे साठी हपापलेले आहेत काही तर असे आहेत की स्वतःला मिळालेला पुरस्कार स्वतःच सांगतात आणि मला शुभेच्छा द्या अशी बोम्ब मारतात,तर काहिना लिहिता वाचता येत नाही तरी दुसऱ्या कडून तयार करुंन शुभेच्छा आणी वाढदिवसाच्या पोस्ट सोशल मीडिया वर फिरवून खोटा भास निर्माण करतात अश्यानी या आनंद सेवा केंद्रा च्या कार्यातुन बोध घ्यावाच गेल्या 18 वर्षा पासून आनंद सेवा केंद्रा च्या वतीने आयोजीत रक्तदान शिबिरास मनमाड शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर सदिच्छा देतात पण या युवा पीढ़ी चे हे सेवा कार्य ही देखील मनमाड ची नवी आणि आदर्श ओळख आहे आणि ती सर्वाना कळली पाहिजे म्हणुन हे लिहिले आनंद सेवा केंद्रा च्या रुग्ण व सामाजिक सेवा उपक्रमा ना मनःपूर्वक शुभेच्छा…………. ……………………………………… एक ऐच्छीक रक्तदाता


अजून बातम्या वाचा..

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.