loader image
[ays_poll id=7]

नाशिक म्हाडा प्रकरणात मोठी अपडेट : 1 मंडल अधिकारी आणि 3 तलाठी निलंबित

Sep 3, 2026


संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिकमधील म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आपल्या अधिकारांचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे काम केल्याचा ठपका ठेवत एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील म्हसरूळ, गंगापूर आणि नाशिक शहर-1 येथील तत्कालीन तलाठी आणि अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली होती. एसआयटीने संबंधित अधिकाऱ्यांच्या काळातील कार्यालयीन दप्तराची सखोल तपासणी केली. या चौकशीदरम्यान संबंधित अधिकारी दोषी आढळल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून थेट निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


अजून बातम्या वाचा..

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
महात्मा फुले  अभ्यासीकेचा लाभ घेऊन उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

महात्मा फुले अभ्यासीकेचा लाभ घेऊन उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

▪मनमाड (प्रतिनिधी)- मनमाडसारख्या दूर्लक्षित शहरातून महात्मा फुले अभ्यासिका व वाचनालयासारखे काम उभे...

read more
.