मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१४ वर्षाआतील, मुले) फुटबॉल स्पर्धेत विजय संपादन केला.
दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी मनमाड येथील सेटं झेवियर हायस्कुल येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव तालूक्यातील शेहजादे इंग्लिश स्कूल, गुरु गोविंदसिंग हायस्कुल, केन्द्रीय विद्यालय मनमाड, एच.ए.के. हायस्कुल, सेटं झेवियर हायस्कुल, मनमाड व गुड शेफर्ड स्कुल, मनमाड या शाळेतील विद्यार्थी फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामना सेंट झेवियर स्कुल, मनमाड व गुड शेफर्ड स्कूल, मनमाड यांच्यामध्ये झाला व अंतिम सामन्यात गुड शेफर्ड स्कूल च्या खेळाडूंनी २ – ० अशा फरकाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सामना जिंकला. विजयी संघाची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तऱीय फुटबॉल स्पर्धे साठी निवड झाली. संघाला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री. व्यंकटेश देशपांडे सर व श्री. रिसम परविंदर ( लकी सर) यांनी केले.
गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...









