loader image
[ays_poll id=7]

दुष्काळ आणि महागाईच्या चक्रात अडकला “बैलपोळा”

Sep 9, 2026

आधीच पावसाने घेतलेली विश्रांती आणि सर्जा-राजाच्या सजावटीच्या साहित्याच्या दरात झालेली वाढ यामुळे सर्जा-राजाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा साजरा कसा करावा? असा प्रश्न परिसरातील शेतकरी राजाला पडला आहे.
पावसाने गेल्या सव्वा महिन्यापासून ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अशा स्थितीत एकीकडे पिके वाचविण्याची चिंता सतावत असतानाच बैलपोळ्याच्या तोंडावर सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या साहित्य दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
शेतमालाचे घसरलेले दर, वाढती महागाई आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे यंदा बैलपोळ्याची खरेदी अत्यंत हात राखून केली जात आहे. परिणामी, दरवर्षी गजबजणाऱ्या बाजारपेठेत यंदा शुकशुकाट असून, व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन

मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन

नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो व सम्राट क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२, २३, २४...

read more
नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मी माझ्या परीने...

read more
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरची धडक कारवाई – २२,८२,००० च्या तब्बल ३० दुचाकी हस्तगत

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरची धडक कारवाई – २२,८२,००० च्या तब्बल ३० दुचाकी हस्तगत

महिला साथीदारांचे मदतीने साईसुपर स्पेशालिटी हॉस्पीटल शिर्डी, येथुन मोटारसायकल चोरी करणारी...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.