loader image
[ays_poll id=7]

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

Sep 9, 2026


हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून कोट्यवधी शिवसैनिकांच्या व जनतेच्या भावना दुखावल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनमाड शहर शाखेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक / पोलीस आयुक्त यांना आज, दि. ०९ सप्टेंबर २०२६ रोजी या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले.
ॲड. सदावर्ते हे वारंवार प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी थोर महापुरुष व आदरणीय नेत्यांबद्दल बेताल वक्तव्ये करत आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता आणि कोट्यवधी जनतेचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल वापरलेले अवमानकारक शब्द अत्यंत निंदनीय असून यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या या व्यक्तव्याचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कठोर कलमांन्वये तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समनव्यक सुनील पाटील, शहरप्रमुख माधव शेलार, ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र आहेर, तालुका सचिव शैलेश सोनवणे, नगरसेवक दीपक दराडे, अमोल नरवडे, संजय कटारे, माजी नगरसेवक विनय आहेर, मायकल फर्नांडीस, उपशहरप्रमुख प्रवीण धाकराव, राजाभाऊ वाघ, संतोष साळुंके, राकेश अहिरराव, वसंत नागरे, सुभाष दरगुडे, संजय सोळसे, बबन आव्हाड, सिद्धांत पाटील, प्रकाश चावरिया, विजय शिनगारे, योगेश परदेशी, गणेश सांगळे, सुनील जाधव, काळू माळी, राहुल वाघमारे, निष्ठावंत शिवसैनिक जाफर मिर्झा आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.*


अजून बातम्या वाचा..

मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन

मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन

नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो व सम्राट क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२, २३, २४...

read more
नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मी माझ्या परीने...

read more
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरची धडक कारवाई – २२,८२,००० च्या तब्बल ३० दुचाकी हस्तगत

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरची धडक कारवाई – २२,८२,००० च्या तब्बल ३० दुचाकी हस्तगत

महिला साथीदारांचे मदतीने साईसुपर स्पेशालिटी हॉस्पीटल शिर्डी, येथुन मोटारसायकल चोरी करणारी...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
शाळकरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंदी येणार ‘अपार’ आयडीत – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

शाळकरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंदी येणार ‘अपार’ आयडीत – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

केंद्रातील सरकार देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करीत आहे. देशभरातील शालेय...

read more
छत्रे विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

छत्रे विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व छत्रे विद्यालय आयोजित नाशिक...

read more
.