नाशिक जिल्हास्तरीय झालेल्या जीत कुनेडो या स्पर्धेत मनमाड येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी भाविका लक्ष्मण कौराने हिने प्रथम तसेच श्रावणी पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला असून त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे शाळेचे संस्थाचालक व शिक्षक शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले. शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक विजय कोळी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव
मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...











