loader image
[ays_poll id=7]

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

Sep 24, 2026


फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या ‘कुपेकार २०२६’ या आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये पॅराग्लायडिंग पायलट तथा पुणे महापालिकेचे माजी पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी मराठी संस्कृतीची वेगळी ओळख जागतिक पटलावर पोहोचवली. या महोत्सवात त्यांनी मराठी शेतकऱ्याच्या पारंपरिक वेशभूषेत पॅराग्लायडिंगचे यशस्वी उड्डाण केले. मंगेश दिघे हे न्यायडोंगरीचे जेष्ठ पत्रकार जगन पाटील यांचे भाचे आहेत.

​१९७९ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या या सात दिवसीय प्रतिष्ठित महोत्सवात जगभरातील विमानांचे एरोबॅटिक्स, हेलिकॉप्टर, हँग ग्लायडर, पॅरामोटर, एरोमॉडेलिंग व हॉट एअर बलून यांची प्रात्यक्षिके सादर केली जातात. यंदा विविध देशांतील नामांकित पायलट्सच्या उपस्थितीत मंगेश दिघे यांनी धोतर, नेहरू शर्ट (झब्बा) आणि डोक्यावर मराठी फेटा अशा अस्सल पारंपरिक शेतकरी वेशात अल्प्स पर्वतरांगांवरून उड्डाण केले.

​पॅराग्लायडिंगच्या तांत्रिक व सुरक्षा नियमांत कोणताही बदल न करता, हार्नेससह हेल्मेटवर बांधलेला फेटा आणि पारंपरिक पेहराव सावरत त्यांनी घेतलेली ही भरारी हजारो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचे मुख्य आकर्षण ठरली. पर्यावरण संवर्धनानंतर साहसी क्रीडा प्रकारातही मराठी संस्कृतीचा डंका सातासमुद्रापार वाजवल्याबद्दल मंगेश दिघे यांच्या या अद्वितीय साहसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.