Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर

Sep 26, 2026

पावसाळ्यातील यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच मान्सूनने ओढ दिल्याने राज्यातील काही भागांसह नांदगाव तालुक्यासह येवला, चांदवड आणि मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस आणि पाण्याअभावी पिके करपून गेली आहेत. तर अपुऱ्या पावसामुळे पुढच्या काही महिन्यात राज्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, अशी शक्यता दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दुष्काळी भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आज राज्य सरकारने राज्यामध्ये दुष्काळ पडल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

यावर्षी राज्यात पावसाला उशिराने सुरुवात झाली होती, तसेच पर्जन्यमानही सुरुवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी होते. जूननंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यामध्ये म्हणावी तशी पर्जन्यवृष्टी झाली नाही. तसेच सप्टेंबर महिनाही तुरळक ठिकाणी झालेला पाऊस वगळता कोरडा गेला आहे. त्यामुळे खरीपाच्या हंगामातील शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने आज राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ पडल्याची घोषणा केली आहे. नांदगाव तालुक्यात सुरूवाती पासून पावसाने ओढ दिल्याने बळीराजावर अस्मानी संकट कोसळले होते ह्या सर्व परिस्थितीचे गांभीर्य ओळखत नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. नांदगाव ताल्युक्याचा ट्रिगर १ मधे समावेश करण्यात आल्याने तालुक्यात दुष्काळाची किती दाहकता आहे याचा अंदाज येतो.या तालुक्यांचा विस्तार पाहिल्यास राज्यातील सुमारे 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर झाला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ...

read more
मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी

मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी

मणिपूर राज्यात दोन महिलांची नग्न हिंड काढत त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केल्याच्या घटनेच्या नीच...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]