loader image
[ays_poll id=7]

सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यात चार मार्गांवर जनसुविधा केंद्रे उभारणार

Sep 28, 2026

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारकांना, विशेषतः महिलांना, स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार ठिकाणी जनसुविधा केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या केंद्रांमध्ये महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, २४ तास पाणी व वीजपुरवठा, पार्किंग, सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पांसाठी डिझाईन, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन आणि देखभाल (DBFOT) या स्वरूपात इच्छुकांकडून स्वारस्य देकार मागवले आहेत. केंद्रांचा सवलत कालावधी १५ वर्षांचा राहणार आहे.

– देशमाणे बु. : नाशिक-निफाड-येवला-वैजापूर मार्गावर पहिले केंद्र प्रस्तावित आहे.

– गिरणारे : अडगाव-गिरणारे-वाघेरा-चिंचवड-खेड-हरसूल-खडक-ओझर-घोडबारी राज्य मार्ग २८ वर दुसरे केंद्र उभारण्यात येणार आहे.

– चिखल ओहोळ : मुंबई-नाशिक-धुळे-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ३ वर तिसरे केंद्र प्रस्तावित आहे.

– सुरगाणा : सौंदाणे (NH-3)-देवळा-कळवण-कनाशी-हटगड-खडकी-सुरगाणा-उंबरठा-वाघाई राज्य मार्ग २२ वर चौथे केंद्र उभारण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.