loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात 53 व्या कुमार गट मुले अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

Oct 1, 2026


मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील मित्र मंडळ, युवक क्रांती क्रीडा मंडळ, मनमाड व जय भवानी अद्यावत व्यायामशाळेच्या आयोजनाखाली नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 53 वी कुमार गट मुले जिल्हा चाचणी अजिंक्यपद व निवड स्पर्धा ही जय भवानी व्यायामशाळेत संपन्न होणार आहे.

2 ऑक्टोबर पासून सुरू होणारी स्पर्धा 4 ऑक्टोबर 2026 पर्यंत होणार आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने साखळी पद्धतीने व बाद पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेमधून निवडणारा संघ हा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या राज्य कुमार गट अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या जिल्हास्तरीय कुमार गट निवड चाचणी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून जवळपास 32 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. कुमार गटाच्या या स्पर्धा चुरशीने होणार असल्याचे डॉक्टर दत्ता शिंपी यांनी सांगितले आहे. प्रो-कबड्डीच्या मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धा आयोजनामध्ये बाळासाहेब पाटील यांच्या मित्र परिवारातील छत्रपती आवर्डी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले सुनील जाधव , छत्रपती आवार्डी हनुमान महाडिक, छत्रपती आवर्डी सागर बांदेकर, प्रकाश लाड, डॉक्टर शरद शिंदे, जय भवानी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पोपटशेठ बेदमुथा, राज्य कबड्डी संघटनेचे सहकार्यवाह मोहन गायकवाड, आशिष पाटील आदि हिरारीने भाग घेत आहे.


अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
.